विनोदाचा चेहरा बदलला   

मंगला गोडबोले यांचे प्रतिपादन 

पुणे : मराठी विनोदाची वाट दीर्घकालीन आहे. त्यामुळे विनोदाला मरण नाही. सध्या विनोदाचा सर्वत्र टे्रंड सुरू आहे. विनोद हे काळानुसार बदलत असते. विशेषत: रूढी, परंपरा, चालीरितीप्रमाणे विनोद जन्म घेत असतो. प्रत्येकाला परिस्थितीनुसार विनोद स्वीकारावे लागते. त्यामुळे सध्याच्या आधुनिक काळात  विनोद नष्ट झाला नाही तर त्याचा चेहराच बदलला आहे, असे मत ज्येष्ठ प्रसिध्द लेखिका मंगला गोडबोले यांनी बुधवारी व्यक्त केले.
 
वक्तृत्वोत्तेजनक सभेतर्फे आयोजित ’वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्राचे तिसरे पुष्प लेखिका मंगला गोडबोले यांनी ’मराठी विनोद-काल, आज आणि उद्या’ या विषयावर गुंफले. त्यावेळी त्या बोलत होत्या. मराठी विनोदाला भाषेची चांगली पक्कड असते. भाषेचा उच्चार अगदी व्यवस्थीत व्हायला हवा. विनोदातील भाषेत नीट-नेटकेपणा असणेही गरजेचे आहे. प्रत्येकाने व्यापारी स्वरूपाच्या विनोदापासून दुर राहायला हवे. आपणही अनावश्यक विनोद सोडले पाहिजे, असेही गोडबोले यांनी नमूद केले. 
 
मंगला गोडबोले म्हणाल्या, मराठी विनोदाला परंपरा नाही. विनोदाला संत साहित्याचा वारसा देखील लाभला आहे. विनोद हे प्रत्येक क्षेत्रात आढळून येते. यासह त्यांची व्यक्तीरेखा भिन्न व वेगवेगळी स्वरूपाची असल्याचे दिसून येते. बर्‍याच विनोदांमध्ये शाब्दीक शब्दांचा जास्त प्रमाणात उल्लेख केला गेला आहे. आधुनिक मराठी विनोदात केवळ पुरूष व्यक्तींनाचा महत्व प्राप्त झाले आहे. यात महिला विनोद कलावंताना स्थानच नसल्याचे दिसते. येत्या काळात विनोदाच्या लेखनकार्यात महिलांनी अधिक सक्रीय व्हावे, ही गरज आहे. बोटावर मोजता येतील ऐवढयाच महिला लेखिका सध्या विनोदाच्या लेखनक्षेत्रात कार्यरत आहेत. पुढे ही संख्या वाढायला हवी, असेही गोडबोले यांनी स्पष्ट केले.
 
विनोदाच्या क्षेत्रात अनेक लेखकांनी आपली कारर्किद गाजवली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, श्रीपाद कोलटकर, पु. ल. देशपांडे यांचा समावेश आहे. गडकरी यांनी ’एकच प्याला’ या विनोदी नाटयद्वारे रसिकांचा काहीसा मानसिक ताण कमी करण्याचा विशेष प्रयत्न केला. त्यांनी आपल्या  बर्‍याचदा विनोदी लेखानामध्ये काव्यभरणा अधिक प्रमाणात केला आहे. तसेच, गडकरींना विनोदी साहित्याची चांगली पक्कड होती. पु. ल. देशपांडे यांच्या विनोदी लिखानाची वाट ललितगद्य अशी आहे. त्यामध्ये शाब्दीक खेळ आहे. त्यांनी भाषिक वैभवावर सुध्दा अधिक भर दिला. मराठी भाषा वाकवली, वापरली असा त्यांच्या विानेदी लिखानाचा सूर होता. असेही गोडेबोले यांनी सांगितले. 
 
डॉ. अंबरिश खरे यांनी सूत्रसंचालन केले. वसंत व्याख्यानमाला २० मे पर्यंत दररोज सायंकाळी ६ वाजता टिळक स्मारक मंदिरात होईल. व्याख्यानमाला विनामूल्य आणि सर्वांसाठी खुली आहे.
 

Related Articles